खोजेवाडी फाटा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:41 IST2019-05-25T22:41:08+5:302019-05-25T22:41:18+5:30

मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाटा येथे शुक्रवार रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

 Two-wheeler killer killed in an accident at Discovery Fort | खोजेवाडी फाटा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

खोजेवाडी फाटा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

वाळूज महानगर : मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाटा येथे शुक्रवार रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दीपक सोमीलाल शिंदे (३० रा. रांजणगाव शेणपुंजी) असे मृताचे नाव आहे.


दीपक शिंदे हा शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील आघूर या मूळगावी गेला होता. तो रात्री तेथून दुचाकीने रांजणगाव शेणपुंजीच्या दिशेने निघाला. खोजेवाडी फाटा येथे रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास दीपकच्या दुचाकीचा अपघात झाला.

यात गंभीर जखमी झाल्याने दीपकला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याला तपासून मृत घोषित केले. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ.कारभारी देवरे हे करीत आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांनुसार दीपक शिंदे लासुरकडून रांजणगावकडे येत असताना त्याने सुनील जनार्धन वाकळे (रा.धानोरा,ता.गंगापूर) याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुनील वाकळे हा जखमी झाला असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title:  Two-wheeler killer killed in an accident at Discovery Fort