अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:05 IST2021-05-20T04:05:26+5:302021-05-20T04:05:26+5:30

सध्या कन्नड येथे स्थायिक असलेले अशोक थोरात काही कामानिमित्त मूळगावी नाचनवेलकडे दुचाकी (एमएच.२०,बीडी. ६०२७)ने येत होते. मोहाडी फाट्यानजीक पाठीमागून ...

Two-wheeler killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सध्या कन्नड येथे स्थायिक असलेले अशोक थोरात काही कामानिमित्त मूळगावी नाचनवेलकडे दुचाकी (एमएच.२०,बीडी. ६०२७)ने येत होते. मोहाडी फाट्यानजीक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीशकुमार बोराडे, सतीश बडे, विजय आहेर, पाटील, नागलोत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अशोक थोरात हे शिवाजी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मीना वडगुळे यांचे पती, तर जि.प.चे माजी बांधकाम सभापती विठ्ठलराव थोरात यांचे लहान बंधू होत. कुलदीप थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फोटो :

Web Title: Two-wheeler killed in unidentified vehicle collision