ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:12 IST2019-07-18T22:12:19+5:302019-07-18T22:12:31+5:30
वाळूज महानगर : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार त्र्यंबक जगन्नाथ शिंदे(४० रा.नांदेडा) हा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० ...

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
वाळूज महानगर : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार त्र्यंबक जगन्नाथ शिंदे(४० रा.नांदेडा) हा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्यावर घडली. जखमी दुचाकीस्वारास ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
त्र्यंबक शिंदे हा दुचाकीने (एम.एच.२०, ए.ई.६९७७) गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई- नागपूर महामार्गावरुन जात असताना त्याला ट्रकने जोराची धडक दिली. यात त्र्यंबक शिंदे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.