कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:33 IST2019-08-30T23:33:39+5:302019-08-30T23:33:53+5:30
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
वाळूज महानगर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) बजाजनगरातील मोरे चौकात घडली. विनोद रामदास तावळे (४०, रा. हर्सुल) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
विनोद तावळे हे शुक्रवारी दुचाकीवरुन (एमएच-२०, डीझेड-२३४३) वैष्णोदेवी उद्यानाकडून मोरे चौकमार्गे बजाजनगरकडे जात होता. दरम्यान पंढरपूर तिरंगा चौकातून भरधाव कार (एमएच-२०, एवाय-४०) रांजणगावच्या दिशेने जात होती. मोरे चौकात रस्ता ओलांडत असताना कारने तावळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तावळे जखमी झाले.
कारचालकाने तावळे याला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या अपघाताची पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.