अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:50+5:302021-05-05T04:07:50+5:30
गल्ले बोरगाव : धुळे-सोलापूर महामार्गावरील गल्ले बोरगाव शिवारातील देवगाव फाट्यावर कन्नडकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एक गंभीर
गल्ले बोरगाव : धुळे-सोलापूर महामार्गावरील गल्ले बोरगाव शिवारातील देवगाव फाट्यावर कन्नडकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार बाळासाहेब दत्तू हिवाळे (४५, रा. कादरपूर-देवळाणा, ता. कन्नड) हे गंभीर झाले. मंगळवारी (दि. ४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
बाळासाहेब हिवाळे हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २० एडी ८९७३) गल्ले बोरगावमार्गे कादरपूरकडे जात होते. दरम्यान, कन्नडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने देवगाव फाट्यावर हिवाळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलीस सय्यद, नरोटे, शिरोडकर, शांताराम सोनवणे, बिट जमादार वाल्मीक कांबळे, अक्षय पुरंदरे, देवळाणाचे सरपंच आकाश उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर झालेले हिवाळे यांना वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबादेत पाठविण्यात आले. देवगाव फाट्यावर स्ट्रीट लाइट सुरू नसल्याने महामार्गावर अपघात होतात. त्यामुळे येथे अपघात सत्र सुरूच आहे. महामार्गावरील लाइट सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मनोहर पुंगळे, वाल्मीक कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.