तुळजापूर शिवारात दुचाकीला ट्रकची धडक, पत्नी ठार, पती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:00+5:302020-12-30T04:07:00+5:30

कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील शांतीलाल महेर व पत्नी संगीता महेर हे दोघे औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दुचाकी(क्र.एमएच २० ...

Two-wheeler hit by truck in Tuljapur Shivara, wife killed, husband seriously injured | तुळजापूर शिवारात दुचाकीला ट्रकची धडक, पत्नी ठार, पती गंभीर

तुळजापूर शिवारात दुचाकीला ट्रकची धडक, पत्नी ठार, पती गंभीर

कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील शांतीलाल महेर व पत्नी संगीता महेर हे दोघे औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दुचाकी(क्र.एमएच २० बीयु ५६७२)ने जात असताना तुळजापूर शिवारात पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच २० एटी ५०९५)ने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे यात संगीता महेर या जागेवरच ठार झाल्या. तर जखमी शांतीलाल महेर यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत संगीता यांचे फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान घटनेतील ट्रकचालक अपघात होताच, ट्रक सोडून फरार झाला. सदर अपघाताची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक सोकटकर करीत आहेत.

फोटो कॅप्शन : औरंगाबाद -जळगाव महामार्गावर तुळजापूर शिवारात झालेल्या ट्रक दुचाकी अपघाताचे चित्र.

२ मयत संगीता महेर यांचा फोटो

Web Title: Two-wheeler hit by truck in Tuljapur Shivara, wife killed, husband seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.