शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

दोन रेल्वे रद्द, खाजगी बसगाड्या निम्म्यावर, मुंबईच्या विमानाला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:24 IST

मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.

ठळक मुद्देमुंबईतील पावसाचा परिणाम : प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

औरंगाबाद : मुंबईत बरसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी औरंगाबादहून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. मुंबईहून येणारी आणि मुंबईला जाणारी तपोवन एक्स्प्रेस रद्द झाली. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच धावली. याबरोबर मुंबईतील पावसामुळे अनेकांनी प्रवास टाळल्याने एसटी आणि खाजगी बसच्या संख्येवरही परिणाम झाला. त्याबरोबर मुंबईहून येणाºया विमानालाही दोन तास विलंब झाला.मुंबई परिसरातील जोरदार पावसामुळे आणि सोमवारी मुंबई-पुणेदरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे अनेक रेल्वेंवर परिणाम झाला. यामुळे २ जुलै रोजी सुटणाºया मुंबई-नांदेड-मुंबई या दोन्ही तपोवन एक्स्प्रेस (१७६१७-१७६१८) रद्द करण्यात आल्या. तसेच १ जुलैला सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२) नाशिकपर्यंतच धावली. २ जुलैला सुटणारी मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसही (११४०१) नाशिक येथूनच सोडण्यात आली.१८ बोगींच्या तपोवन एक्स्प्रेसने औरंगाबादहून दररोज तीनशे ते चारशे प्रवासी मुंबईला जातात. मुंबईतील पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याची माहिती अनेक प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अनेक प्रवासी रेल्वेस्टेशनवर दाखल झाले होते. मात्र, याठिकाणी आल्यानंतर रेल्वे रद्द झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे रेल्वेस्टेशनहून माघारी फिरण्याची वेळ अनेकांवर आली. रेल्वे रद्द झाल्याने अनेकांनी तिकीट रद्द करून रिफं ड घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी केली होती. मुंबईला जाणे आवश्यक असल्याने अनेक जण खाजगी बसकडे वळले. मात्र, याठिकाणी अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचा अनुभव अनेकांना आला.प्रवासी घटलेएसटी महामंडळाच्या मुंबईसाठी पाच बस धावतात. पावसाळ्यात एसटी प्रवासी संख्येवर परिणाम होत असतो. त्यात मुंबईत पाऊस सुरू असल्याने मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या कमी झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. औरंगाबादहून दररोज ३० खाजगी बस मुंबईला जातात; परंतु ही संख्या अर्धी झाल्याची माहिती औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजन हौजवाला यांनी दिली.विमानाला उशीरएअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद विमान दुपारी ३.२५ वा. उड्डाण करते. सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास हे विमान औरंगाबादला येते; परंतु या विमानाला जवळपास दोन तास विलंब झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस