शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दोन टन वजनाची तिजोरी चोरांना फुटलीच नाही; पोलिसांची चाहूल लागताच ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 7:46 PM

The two-ton safe did not break by the thieves : तिजोरी फोडण्याचा आवाज येत असल्याने पोलिसांचे पथक व कंपनीचे कर्मचारी अंधारात आवाजाच्या दिशेने गेले

ठळक मुद्देपोलिसांच्या सतर्कतेमुळे साडे दहा लाख बचावले

वाळूज महानगर : चोरट्यांनी साडेदहा लाख रुपये असलेली तिजोरी लांबविली पण दोन टन वजनाची लोखंडी तिजोरी त्यांना उघडता आली नाही. शेवटी त्यांनी ती १०० मीटरपर्यंत ढकलत नेली. तिथे हत्याराने ती फोडण्याचा प्रयत्न करताना ते घामाघूम झाले. तिजोरी फुटलीच नाही. शेवटी पोलीस आल्याची चाहूल लागल्याने चोरटे पळून गेले. तिजोरीतील रोकड वाचली. ( One and a half lakh were saved due to police vigilance in Waluj MIDC area )

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपुरात घडली. फ्लिपकार्ट कंपनीच्या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी तिजोरी लांबविली होती. रविवार रात्री १०.३० वाजेच्या सुमारास कार्यालय बंद करून कर्मचारी घरी निघूृन गेले होते. सोमवार पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास या कार्यालयात काम करणारे संदेश रामेश्वर घुवारे हे कार्यालय उघडण्यासाठी आले असता त्यांना कार्यालयाचे शटर उचकटलेले व अर्धे उघडे असलेले दिसले. कार्यालयातील लोखंडी तिजोरी गायब झालेली होती. हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच घुवारे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे सहायक निरीक्षक एम. आर. घुनावत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी तिजोरी फोडण्याचा आवाज येत असल्याने पोलिसांचे पथक व कंपनीचे कर्मचारी अंधारात आवाजाच्या दिशेने निघाले असता जवळपास १०० मीटर अंतरावर मोकळ्या मैदानातून आवाज येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान, पोलिस आल्याची चाहूल लागताच तिजोरी फोडणारे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिजोरी उघडून पाहिली असता आतमध्ये ठेवलेले १० लाख ५९ हजार ७९७ रुपये सुरक्षित होते. या कंपनीच्या कार्यालयातील ड्राॅवरमध्ये ठेवलेले २६ हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागल्याने त्यांनी ही रक्कम लांबविली.

दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदया कंपनीच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २ वाजेच्या सुमारास दोन चोरटे या कार्यालयासमोर येताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून शटरचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉक तुटत नसल्याने चोरट्यांनी काहीतरी हत्याराने शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयाची झाडाझडती घेऊन ड्राॅवरमध्ये ठेवलेले २६ हजार रुपये काढून घेतले. यानंतर चोरट्यांनी अवजड तिजोरी हत्याराच्या साहाय्याने उखडून काढत तिला ढकलत-ढकलत जवळपास १०० मीटर अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेली. या ठिकाणी तिजोरी फोडत असतानाच पोलिस आले. या प्रकरणी कंपनीचे संदेश घेवारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसी