आशा वर्करच्या खात्यात दोन हजार जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:08+5:302020-11-12T07:29:08+5:30

सीटूप्रणीत आशा आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे कोरोना काळातील कामाबद्दल दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली ...

Two thousand will be credited to Asha Worker's account | आशा वर्करच्या खात्यात दोन हजार जमा होणार

आशा वर्करच्या खात्यात दोन हजार जमा होणार

सीटूप्रणीत आशा आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे कोरोना काळातील कामाबद्दल दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, मनपा आयुक्तांनी दोन हजार रुपये मानधन देण्याचे मान्य केले होते. तेही वेळेवर मिळत नसल्याने आशा कर्मचारी नाराज होत्या. आता दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना तरी हे मानधन मिळावे यासाठी मंगळवारी उपायुक्त बी.जी. नेमाडे व आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. सप्टेंबर-ऑक्टोबर दोन महिन्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपये तातडीने आशा वर्करच्या खात्यावर जमा करण्याचे ठरले. यावेळी आशा वर्कर्सच्या नेत्या कॉ. मंगल ठोंबरे, पुष्पा शिरसाठ, संगीता जोशी, मानसी अभ्यंकर, फुरखाना फातेमा आदींची उपस्थिती होती.

Web Title: Two thousand will be credited to Asha Worker's account