शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गचे दोन उपविभाग हलविले औरंगाबादला

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागामार्फत होणार आहे.

बीड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागामार्फत होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची पुनर्रचना नुकतीच केली असून जिल्ह्यातील दोन उपविभाग औरंगाबाद येथील कार्यालयाशी जोडण्यात आले आहेत.धुळे- सोलापूर व कल्याण- विशाखापट्टणम् हे दोन स्वतंत्र महामार्ग जिल्ह्यातून गेलेले आहेत. धुळे- सोलापूर महामार्ग क्र. २११ चे जिल्ह्यातील अंतर ८० किलोमीटर इतके आहे. कल्याण- विशाखापट्टणम् या महामार्ग क्र. २२२ चे जिल्ह्यातील अंतर ११२ किलोमीटर आहे. धुळे- सोलापूर महामार्गावर चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु आहे. दरम्यान, औरंगाबाद ते येडशी व येडशी ते सोलापूर अशा दोन टप्प्यांत होणाऱ्या या कामांवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे थेट नियंत्रण राहील. या विभागाचे कार्यालय औरंगाबाद येथे आहे.चौपदरीकरण होईपर्यंत धुळे- सोलापूर महामार्ग याच विभागाच्या ताब्यात असेल. त्यामुळे माजलगाव व गेवराई येथील महामार्ग उपविभागांना कामच उरले नाही. त्यामुळे हे दोन्ही उपविभाग औरंगाबाद येथील महामार्ग विभागाशी जोडले (अटॅच) आहेत. ३२ जणांचा कर्मचारीवर्ग आता औरंगाबाद येथील कार्यालयात काम पाहत आहे. ही पूनर्रचना केवळ बीडमध्येच झाली असे नाही तर राज्यभरात अशा प्रकारचे फेरबदल केल्याचे उपकार्यकारी अभियंता व्ही. यू. मचाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)