मानवतमध्ये दोन स्टोन क्रेशरला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST2017-07-21T00:22:27+5:302017-07-21T00:26:37+5:30
मानवत : मानवत शहरात विनापरवाना सुरू असलेल्या दोन स्टोन क्रेशरला महसूल प्रशासनाने १९ जुलै रोजी दुपारी सील ठोकले.

मानवतमध्ये दोन स्टोन क्रेशरला ठोकले सील
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : मानवत शहरात विनापरवाना सुरू असलेल्या दोन स्टोन क्रेशरला महसूल प्रशासनाने १९ जुलै रोजी दुपारी सील ठोकले.
शहरातील चव्हाण स्टोन क्रेशर आणि दहे स्टोन क्रेशर यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना नव्हता. तरीही मागील काही दिवसांपासून अनधिकृतरित्या हे स्टोन क्रेशर सुरू होते. तसेच चव्हाण स्टोन क्रेशर रॉयल्टी न भरता चालविले जात असल्याची तक्रार नगरसेविका मीरा मोहन लाड यांनी तहसीलदाराकडे केली होती. त्यावरुन या स्टोन क्रेशरला सील करण्याचे आदेश तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी २८ जून रोजी मंडळ अधिकारी यांना दिले होते.
मात्र कारवाई झाली नाही. त्यामुळे १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांचा परवाना नसल्याच्या कारणावरुन मंडळ अधिकारी जी.पी. कण्व आणि तलाठी एम.आर. जाधव यांनी चव्हाण आणि दहे स्टोन क्रेशरला सील ठोकले आहे.