शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिजवाडीत दोन गुळगुळीत सिमेंट रस्ते

By admin | Updated: July 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : वॉर्ड क्र. २२ नारेगाव-ब्रिजवाडीत आज सकाळी अत्यंत उत्साही वातावरणात दोन सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

औरंगाबाद : वॉर्ड क्र. २२ नारेगाव-ब्रिजवाडीत आज सकाळी अत्यंत उत्साही वातावरणात दोन सिमेंट रस्त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून रस्त्यांची ही कामे घेण्यात आली. रस्ता होण्यापूर्वी याठिकाणी अत्यंत भयानक परिस्थिती होती. पायी चालणे अवघड व्हायचे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असायचे. अपघातांना निमंत्रण मिळायचे. स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाकडे राजेंद्र दर्डा यांचे लक्ष वेधले आणि दिलेला शब्द पाळून हे सिमेंट रस्ते करून दिले. याचा विशेष आनंद नागरिकांनी व्यक्त केला. विशेषत: महिलांनी याबद्दल गौरवोद्गार काढले. कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे, संतोष लखोटिया, बबन डिडोरे पाटील, कादर शहा, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अशोक डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्यास ब्रिजवाडी आणि नारेगाव येथील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. फटाक्यांच्या आतषबाजीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ब्रिजवाडी येथील छोटे हेडगेवार रुग्णालय- संजय ढगे यांच्या घरापासून ते गणेश बोर्डे यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन माजी नगरसेवक भगवान रगडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर ब्रिजवाडी येथील गल्ली नं.१ काशीनाथ नरवडे यांच्या घरापासून ते रामराव जाधव यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन काशीनाथ नरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्धविहारासमोर झालेल्या सभेत डिडोरे, रगडे, डोळस, दामूअण्णा यांची भाषणे झाली. सुभाष हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले. ‘राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने विकासाच्या गंगेचे पाणी नक्कीच ब्रिजवाडी- नारेगाव परिसरात खळाळत आहे. यापूर्वी कोणत्या खासदाराचा अन् आमदाराचा निधी इकडे कधी आला नव्हता; परंतु गरिबांची जाण असलेले राजेंद्र दर्डा यांनी जाणीवपूर्वक अनेक विकासकामे करून या भागाचा कायापालट करून दाखवला आहे’ अशी प्रतिक्रिया आपल्या भाषणातून भगवान रगडे- सुभाष हिवराळे यांनी व्यक्त केली. यावेळी सा.बां. चे. उपअभियंता ए.डी. घेवारे, शाखा अभियंता एस.एस. भोसले तसेच अण्णासाहेब पाखरे, आनंद लोखंडे, रेखा देशमुख, पुंडलिक हिवराळे, संजय पट्टेकर, साहेबराव नन्नावरे, परमेश्वर सुरडकर, रमाबाई काळे, प्रगती देशमुख, लता खंडागळे, शारदा चिपडू, अरुणा वाघमारे, पंकज देशमुख, अनिल बोर्डे, भीमराव घोरपडे, नागेश आठवले, सुमन ढेपे, माया हिवराळे, मंदा जाधव, विजया भोळे आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विशेष निधीतून ब्रिजवाडीत तयार करण्यात आलेल्या दोन सिमेंट रस्त्यांच्या लोकार्पणप्रसंगी पंकज फुलपगर, भगवान रगडे, बबन डिडोरे, दामूअण्णा शिंदे, सुभाष हिवराळे, कादर शहा, अशोक डोळस, संतोष लखोटिया, कुंडलिक हिवराळे, सुमनबाई ढेपे, कांता सोनवणे, मंदाबाई जाधव, मायादेवी हिवराळे, रेखा देशमुख, रमाबाई काळे आदी उपस्थित होते.