जिल्ह्यात दोन रस्त्याची दुरवस्था... ‘परिवहन’ला ७२ कोटींचा महसूल

By Admin | Updated: January 9, 2015 00:51 IST2015-01-09T00:28:34+5:302015-01-09T00:51:25+5:30

लातूर : लातूर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वर्षाकाठी विविध कारवायातून मिळणाऱ्या महसूलाबाबत ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़

Two road junctions in the district ... 'Transport' revenues of 72 crores | जिल्ह्यात दोन रस्त्याची दुरवस्था... ‘परिवहन’ला ७२ कोटींचा महसूल

जिल्ह्यात दोन रस्त्याची दुरवस्था... ‘परिवहन’ला ७२ कोटींचा महसूल


लातूर : लातूर शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वर्षाकाठी विविध कारवायातून मिळणाऱ्या महसूलाबाबत ७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी ७२ कोटी ५९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल मिळविला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डी़टी़ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़
यावेळी बोलताना पवार म्हणाले, यावर्षी १०२ कोटीच्या महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ तेही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असे मतही त्यांनी व्यक्त केले़ तसेच दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ११ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे़ यामध्ये शहरातील मुख्य चौकामध्ये रस्ता सुरक्षा संदर्भात बॅनर्स, पोस्टर्स लावणे, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड, अनुज्ञाप्ती रद्द, ड्रंकन ड्राईव्ह/ ओव्हरस्पिड तसेच वाहनांच्या काचावर काळे फिल्म बसविलेल्या वाहनावर कारवाई करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे़
या सप्ताहाचा प्रारंभ १२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे़ या सप्ताहमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, एड्स जनजागृती कार्यक्रम, रस्ता सुरक्षा अभियानाविषयी चित्रफित प्रदर्शित करणे, मुख्याध्यापकाची कार्यशाळा, विद्यालयीन विद्यार्थ्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत व २६ जानेवारी रोजी लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डी़टी़ पवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असले तरी रस्त्यातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पाठपुरावा करुन लातूर, अहमदपूर व औसा, लातूर, अहमदपूर या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी पाठपुरावा केला आहे़ तरीही त्याची दुरुस्ती झाली नाही़ या राष्ट्रीय मार्गाची दुरावस्था असतानाही रस्ता सुरक्षा अभियान घ्यावे लागत आहे़ यापुढील कालावधीतही रस्ता सुरक्षेविषयी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करु असेही मत त्यांनी व्यक्त केले़

Web Title: Two road junctions in the district ... 'Transport' revenues of 72 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.