दोन रोडरोमिओंना पकडले
By Admin | Updated: January 15, 2015 00:07 IST2015-01-14T23:44:14+5:302015-01-15T00:07:50+5:30
जालना : शहरातील बस स्थानक व आर.पी रोडवर महिलांची छेड काढणाऱ्या दोन रोडरोमिओला चपकराक देत दामिनी पथकाने पकडले.

दोन रोडरोमिओंना पकडले
जालना : शहरातील बस स्थानक व आर.पी रोडवर महिलांची छेड काढणाऱ्या दोन रोडरोमिओला चपकराक देत दामिनी पथकाने पकडले.
बसस्थानकात दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला प्रवाशांची छेड काढणाऱ्या एका तरूणास तसेच दुपारी २ वाजता महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या एकास आर.पी रोडवर पकडण्यात आले. या प्रकरणी दामिणी पथकाच्या प्रमुख कमल गिरी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही रोडरोमिआेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामिनी पथकात माधुरी खोसे, हिना मेहेर, रुपाली फोके, मेघा नागलोत, वाहनचालक सुरेशा पाटील यांचा समावेश होता. दरम्यान मकर संक्रातीनिमित्त बाजारात महिलांची गर्दी असल्याने हे पथक बाजारात तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त घालत असल्याची माहिती पथकप्रमुख गिरी यांनी दिली.