शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत दोन कैद्यांचा मृत्यू; मृतात कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 14:23 IST

एकाचा हृदयविकाराने तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद : कोठेवाडी प्रकरणात मोक्का अंतर्गत हर्सूल तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासह अन्य एका कैद्याचा आज मृत्यू झाला. कोठेवाडी प्रकरणातील कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर दुसऱ्या कैद्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

हर्सूल कारागृहात हाब्या पानमळ्या भोसले ( ५५, कैदी क्रमांक सी- ६५४४ ) हा मोक्का न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत होता. आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याला कारागृहातून घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.  तर, रमेश नागोराव चक्रुपे ( 60, कैदी क्रमांक सी- ८५७२ ) हा आरोपी घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक १० मध्ये उपचार घेत होता. आज पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याचे उपचार दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही आरोपी हे बाहेरील जिल्ह्यातील होते. मागील काही काळापासून ते हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होते.

काय होते कोठेवाडी प्रकरण ?१७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे संपूर्ण वस्तीवर १० ते १५ आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. या वस्तीवरुन ४४ हजार ३५ रुपयांचे दागिने लुटले होते. सर्व १३ आरोपींना कोठेवाडी प्रकरणात नगरच्या न्यायालयाने जन्मठेप ठोठावण्यात आली होती. यावेळी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या कोठेवाडीतील दरोडा-बलात्कार प्रकरणासह आरोपींचा पाथर्डी, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमध्ये दरोडा, मारहाण, बलात्कार, सामूहिक बलात्कार आदी गुन्ह्यातील सहभाग पोलिसांच्या निदर्शनास आला. यामुळे सर्व आरोपींवर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात खटला चालला. येथे १३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० लाखांचा, तर एकूण १ कोटी ३० लाखांचा दंड मोक्का न्यायालयाने ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूhersulहर्सूल