केबीसी कंपनीविरुद्ध परभणीत दोन गुन्हे
By Admin | Updated: July 31, 2014 00:41 IST2014-07-30T23:46:54+5:302014-07-31T00:41:33+5:30
परभणी : केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

केबीसी कंपनीविरुद्ध परभणीत दोन गुन्हे
परभणी : केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
जुना पेडगाव रोड भागातील रागिनी प्रवीणराव जोशी व प्रवीणराव हनुमंतराव जोशी यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार केबीसी कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास दीड ते दोन वर्षांत चार ते पाच पट पैसे मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. त्यावरुन १ लाख रुपये कंपनीमध्ये भरणा केले, त्याचे प्रमाणपत्र मिळाले व ही रक्कम घेऊन कंपनीने फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
या दोन्ही तक्रारीवरुन भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बाबू छबू चव्हाण, साधना बापुराव चव्हाण, निलेशनाना छबू चव्हाण, कविता निलेश चव्हाण, संदीप यशवंत जगदाळे, सुनील आहेर, सागर पाटील, पंकज राजाराम शिंदे, कृष्णा चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, वामन जगताप, छबू चव्हाण, राजाराम शिंदे व बाजीराव शिंदे या १९ जणांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस.आर. बडे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)