कृषी, पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्याचे दोन महिन्याचे वेतन थकले

By Admin | Updated: May 9, 2015 00:54 IST2015-05-09T00:49:05+5:302015-05-09T00:54:43+5:30

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ६२५ कर्मचाऱ्याना राज्य शासनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा फटका बसला असून आॅनलाईन पध्दतीमधील त्रुटी मुळेदोन महिन्याचे वेतन थकले आहे़

Two months' salary of agriculture, animal husbandry staff is tired | कृषी, पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्याचे दोन महिन्याचे वेतन थकले

कृषी, पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्याचे दोन महिन्याचे वेतन थकले

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ६२५ कर्मचाऱ्याना राज्य शासनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा फटका बसला असून आॅनलाईन पध्दतीमधील त्रुटी मुळेदोन महिन्याचे वेतन थकले आहे़
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व कर्मचाऱ्याचे वेतन आॅनलाईन करण्याच्या प्रक्रिया गतीमान केल्या आहेत़ या आॅनलाईन प्रक्रियेसाठी आॅनलाईन सॉफ्टवेअर अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ त्यातील बिलांचे ट्रेजरी कार्यालयात सादर केले जाणाऱ्या प्रक्रियेतील त्रुटी अंतर्गत कृषी विभागाच्या ३०० , कर्मचारी पशुसंवर्धन विभागाचे ३२५ कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्याचे वेतन थकले आहे़ ऐन उन्हाळ्याच्या सुट्टयात वेतन थकल्याने कुटुंबीयाच्या आनंदावर पाणी पडले असल्याची प्रतिक्रिया वेतन थकलेल्या कर्मचाऱ्याकडून देण्यात येत आहे़ माहागाईच्या काळात दोन महिन्याचे वेतन थकल्याने कर्मचारीवर्गाची फरफट होत आहे़ त्यामुळे हे वेतन कधी होईल याकडे लक्ष लागले आहे़

Web Title: Two months' salary of agriculture, animal husbandry staff is tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.