फळांनी भरलेले कंटेनर घेऊन पसार झालेले दोन व्यापारी जेरबंद

By Admin | Updated: July 22, 2014 00:18 IST2014-07-21T23:42:58+5:302014-07-22T00:18:05+5:30

तीर्थपुरी : शेतकऱ्यांना सकाळी पैसे देण्याचा बहाणा करून डाळींब व टरबुज कॅन्टरमध्य भरून ठेवले. मध्यरात्री ३ वाजता कोणालाही न सांगता नाशिकचे दोन व्यापारी कॅन्टरसह पळून गेले.

Two merchants seized by picking container filled with fruitful merchandise | फळांनी भरलेले कंटेनर घेऊन पसार झालेले दोन व्यापारी जेरबंद

फळांनी भरलेले कंटेनर घेऊन पसार झालेले दोन व्यापारी जेरबंद

तीर्थपुरी : शेतकऱ्यांना सकाळी पैसे देण्याचा बहाणा करून डाळींब व टरबुज कॅन्टरमध्य भरून ठेवले. मध्यरात्री ३ वाजता कोणालाही न सांगता नाशिकचे दोन व्यापारी कॅन्टरसह पळून गेले. या दोन्ही व्यापाऱ्यांना गोंदी पोलिसांनी शिताफीने पकडून ठाण्यात आणले. ही घटना २४ व २५ जून रोजी घडली होती.
तीर्थपुरी येथील संदीप नारायण बोबडे यांचे एक लाख ८० हजार रूपये किंमतीचे डाळींब व एक लाख ५ हजार रूपये किंमतीचे टरबूज तर गणेश आसाराम बोबडे यांचे ४५ हजार डाळींब नाशिक जिल्ह्यातील दोन व्यापाऱ्यांनी दलालामार्फत खरेदी केले होते. संदीप बोबडे यांच्याकडून खरेदी केलेली फळे २४ जूनच्या रात्री नेले. त्यात १ लाख ५ हजार रूपयांचा माल होता. त्यातील ४० हजार रूपये अदा केले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २५ जून रोजी कॅन्टरमध्ये २ लाख २५ हजाराचे डाळींब भरले. चार मजुरी डाळींब तोडण्यासाठी ठेवले. माल कॅन्टरमध्ये भरून रात्रीतून व्यापारी मजुरांसह निघून गेले. दलाल शेतकऱ्यांशी परिचित होता. तो देखील फरार झाला. सर्वांचे मोबाईलही बंद झाले. शेतकऱ्यांना आपण फसल्याची जाणीव होताच त्यांनी गोंदी पोलिस संदीप बोबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपासाची चक्रे फिरवून शारदे (ता. सटाणा) येथील दलाल भगवान सदाशिव विसपुते व रामफरवडे येथील शैलेंद्र अशोक निकम यांना २० जुलै रोजी ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
क्षुल्लक कारणावरुन मारहाण
अंबड तालुक्यातील पिंपळखेड खुर्द येथे प्रल्हाद वखर मिसाळ यांना २० जुलै रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास चौघांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा वाद घरासमोर जुगार खेळण्यातून झाला. आरोपी राहुल फुलसिंग पवार, तठ्या शिवदास राठोड, नितीन द्वारकादास पवार, प्रकाश शामराव पवार यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. राहुल पवारने काठीने प्रल्हाद मिसाळ यांचे डोके फोडून जखमी केले.

Web Title: Two merchants seized by picking container filled with fruitful merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.