दोन लाख रुपये डिक्कीतून लंपास
By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:31:23+5:302014-11-16T00:36:48+5:30
उस्मानाबाद : घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाचे दोन लाख रुपये डिक्कीतून लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील

दोन लाख रुपये डिक्कीतून लंपास
उस्मानाबाद : घराच्या बांधकामासाठी काढलेल्या कर्जाचे दोन लाख रुपये डिक्कीतून लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील जिल्हा क्रीडांगणानजीकच्या व्यापारी संकुलात घडली़ याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील आयुर्वेदिक रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या सतीश रावसाहेब मातोळे (रा़ओमनगर, उस्मानाबाद) यांनी घराच्या बांधकामासाठी शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियातून कर्ज घेतले होते़ कर्जाचे दोन लाख रुपये शनिवारी दुपारी स्टेट बँकेच्या उस्मानाबाद शाखेतून काढून त्यांनी ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते़ ते शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडासंकुलाजवळ असलेल्या व्यापारी संकुलातील एका रंग विक्रीच्या दुकानात खरेदीसाठी गेले होते़ ते दुकानात जावून परत येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या (क्ऱएम़एच़२५- एस़८४१६) डिक्कीचे लॉक तोडून दोन लाख रूपये लंपास केले़ मातोळे हे दुचाकीजवळ आल्यानंतर डिक्कीतील दोन लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना समजले़ त्यांनी परिसरात पाहणी केली मात्र, कोणीच आढळून आले नाही़ घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्यातील प्रभारी पोलीस उपाधीक्षक विकास नाईक, सपोनि किशोर मानभाव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सिध्दे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच रंगाच्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही संशयित कोणी आढळून येतो का याची माहिती घेतली़