बसस्थानकातून दोन लाख लंपास
By Admin | Updated: April 17, 2015 00:39 IST2015-04-17T00:36:52+5:302015-04-17T00:39:49+5:30
उस्मानाबाद : येथील बसस्थानकात तुळजापूरकडे जाण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाच्या पिशवीतील दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली

बसस्थानकातून दोन लाख लंपास
उस्मानाबाद : येथील बसस्थानकात तुळजापूरकडे जाण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाच्या पिशवीतील दोन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, शहरातील गोरोबाकाका नगर भागातील रहिवाशी महादेव बाबाजी आगळे हे बुधवारी दुपारी पिशवीत दोन लाख रूपये घेवून तुळजापूरला जाण्यासाठी बसस्थानकात आले होते़ त्यावेळी चोरट्यांनी आगळे यांच्याकडे असलेल्या पिशवीला पत्ती मारून आतील दोन लाख रुपये हातोहात लंपास केले़ घटना घडल्यानंतर आगळे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली़ आगळे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि धुमाळ हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)