दुचाकी अपघातात दोन ठार; तीन जखमी
By Admin | Updated: May 12, 2014 00:04 IST2014-05-11T23:33:38+5:302014-05-12T00:04:58+5:30
वडीगोद्री: दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

दुचाकी अपघातात दोन ठार; तीन जखमी
वडीगोद्री: दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजता पैठण-शहागड रस्त्यावर घडली. एम.एच.२0/के.एच. ७४४0 व एम.एच.२0/ई. ५0८४ या क्रमांकाच्या दोन दुचाकी डोमलगाव फाट्यावरून समोरासमोर येत होत्या. त्याचवेळी दोन्हींची जोराची धडक होऊन दोनजण ठार तर तीन जण जखमी झाले. या पाच जणांपैकी तुषार कल्याणराव मोरे व संजय एकनाथ मोरे (रा. कातपूर, ता. पैठण) अशी दोघांची मतदान ओळखपत्रे मिळाली. मात्र मृत किंवा जखमींची नावे निश्चित होऊ शकली नाहीत. घटनास्थळी गोदी पोलिस ठाण्याचे कर्मचारी देवीदास भोजने हे एकमेव कर्मचारी हजर होते. याशिवाय अन्य कर्मचारी तिकडे फिरकलेही नाहीत. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)