वसमतजवळील अपघातात दोन ठार
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:47+5:30
वसमत : वसमत- नांदेड रस्त्यावरील पळसगाव शिवारातील निळा पाटीजवळ इनोव्हा कार व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार

वसमतजवळील अपघातात दोन ठार
वसमत : वसमत- नांदेड रस्त्यावरील पळसगाव शिवारातील निळा पाटीजवळ इनोव्हा कार व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.
वसमत-नांदेड रस्त्यावरून नांदेडकडे जाणाऱ्या इनोव्हा कार (क्र. एम.एच.१२-१३३३) ला समोरून येणाऱ्या कंटेनर (क्र. एच.आर. ३८- एस.७२६०) ने जोराची धडक दिली.
या अपघातात कारमधील एक महिला व चालक जागीच ठार झाले. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना नांदेडच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वसमत ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, फौजदार रामेश्वर कायंदे, जमादार शेख रहीम, प्रकाश नेव्हल, वाघमारे, कासले आदी कर्मचारी दाखल झाले होते.
या अपघातात कारमधील महिला सुलोचनाबाई सुधाकर मालीदाला (वय ५४, रा.कामारेड्डी) व चालक हे दोघे जागीच ठार झाले. चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. या अपघातात सुधाकर मालीदाला (६०), अशोक मालीदाला (३५), गौतम मालीदाला (३०) हे तिघे जखमी झाले आहेत.
जखमींना नांदेडच्या दवाखान्यात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. नांदेडकडून जवाब आल्यानंतर या अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोनि रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)