जालन्यातून दोन सराफांना अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:08 IST2017-12-06T01:08:20+5:302017-12-06T01:08:25+5:30

सिडको परिसरातील एन-३ येथे राहणाºया संजय दराडे यांच्या घरातून खिडकी गँगने चोरलेले सोने खरेदी करणाºया दोन सराफा व्यापाºयांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालना येथून मंगळवारी अटक केली. अनिल शालीग्राम शेळके (३९, रा. जालना) व अल्केश अनिल शेळके (२०, रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या सराफांची नावे आहेत.

 Two jewelery from Jalna arrested! | जालन्यातून दोन सराफांना अटक !

जालन्यातून दोन सराफांना अटक !

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको परिसरातील एन-३ येथे राहणाºया संजय दराडे यांच्या घरातून खिडकी गँगने चोरलेले सोने खरेदी करणाºया दोन सराफा व्यापाºयांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालना येथून मंगळवारी अटक केली. अनिल शालीग्राम शेळके (३९, रा. जालना) व अल्केश अनिल शेळके (२०, रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या सराफांची नावे आहेत. खिडकी गँगकडून त्यांनी घेतलेले सहा तोळे सोने जप्त करण्यात आले.
गेल्या महिन्यात शहरातील सिडको एन-१, एन-३, एन-४, व्यंकटेशनगर परिसरातील बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून या गँगने लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. ‘खिडकी गँग’ या नावाने ओळखल्या जाणाºया या टोळीच्या ३० नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. जालन्याच्या दोन्ही सराफांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकॉ. शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विलास वाघ, प्रभाकर राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title:  Two jewelery from Jalna arrested!