कंटेनर-दुचाकी अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 20:48 IST2018-12-15T20:48:43+5:302018-12-15T20:48:59+5:30

कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कंटेनरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रांजणगाव फाटा येथे घडली.

 Two injured in container-bike accident | कंटेनर-दुचाकी अपघातात दोघे जखमी

कंटेनर-दुचाकी अपघातात दोघे जखमी

वाळूज महानगर : कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कंटेनरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रांजणगाव फाटा येथे घडली.


एक कंटेनर (एमएच - २०, एटी - ९७९३) पंढरपूर तिरंगा चौकाकडून शुक्रवारी दुपारी वाळूज औद्योगिक क्षेत्राकडे जात होता. ४ वाजेच्या दरम्यान रांजणगाव फाटा येथे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पाठीमागील ट्रीपलसीट येणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून दुचाकी कंटेनरवर धडकली. यात दुचाकीवरील तिघे तरुण खाली पडले. यात राहुल सुरडकर (२५) व विशाल बरखाडे (२५, रा. दोघे रांजणगाव) हे जखमी झाले. चौकातील नागरिकांनी या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिसºया तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Two injured in container-bike accident

टॅग्स :Walujवाळूज