नळणीत दोन घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By Admin | Updated: April 13, 2016 00:47 IST2016-04-13T00:43:36+5:302016-04-13T00:47:39+5:30

केदारखेडा : येथून जवळ असलेले नळणी खुर्द येथिल भिका नामदेव दाहीजे व दुर्गाबाई भगवान दाहिजे याच्ंया दोन्ही राहत्या घराला सोमवारी आग लागून

Two houses were set on fire in Tulpan and burnt toxic material | नळणीत दोन घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक

नळणीत दोन घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक


केदारखेडा : येथून जवळ असलेले नळणी खुर्द येथिल भिका नामदेव दाहीजे व दुर्गाबाई भगवान दाहिजे याच्ंया दोन्ही राहत्या घराला सोमवारी आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ यात मात्र जिवितहानी टळली असली तरी या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़
भोकरदन तालुक्यातील नळणी येथील दाहीजे कुटूंब सोमवारी सकाळी घरातील काम अटोपून शेताकडे गेले असता अचानक त्यांच्या राहत्या घराला आग लागली़ ही आग मोठी असल्याने घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़ परंतु आग आटोक्यात येईपर्यंत सर्व जळून खाक झाले होते़ शिवाय उन्हाळा असल्याने जवळपास पाणी उपलब्ध नव्हते़ टँकर आगीस्थळी येईपर्यंत आग वाढली होती़ हे दोन्ही घरे शेजारी असल्याने एका घरात लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण करुन शेजाराच्या घरात शिरल्याने दोन्ही घरांना आगीचा वेढा पडला होता़ या आगीत सात ते आठ क्विंटल धान्य, दाळी, रोख रक्कम दहा हजार रुपये, कपाट, टिव्ही, पंखा, कपडे यासह दोन्ही घरातील संसार उपयोगी साहित्य पूर्णत हा जळून खाक झाले. त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली़ आग विझविण्यासाठी सरपंच गणेशराव वराडे, कमलाकर वराडे, गुलाबराव वराडे, गजानन वराडे, विजय वराडे, भरत वराडे, रमेश वराडे, अरविंद दाहीजे, अनिल दाहिजे, नवनाथ वराडे, गणेश वराडे आदींनी प्रयत्न केले़ घटनेचा पंचनामा तलाठी देशमुख यांनी केला.

Web Title: Two houses were set on fire in Tulpan and burnt toxic material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.