औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:05 IST2021-01-20T04:05:52+5:302021-01-20T04:05:52+5:30

चौका : औरंगाबाद जळगाव महामार्गावर चौकानजीक रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीकरिता एकेरी रस्ता आहे. या एकेरी ...

Two-hour traffic jam on Aurangabad-Jalgaon highway | औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

चौका : औरंगाबाद जळगाव महामार्गावर चौकानजीक रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीकरिता एकेरी रस्ता आहे. या एकेरी मार्गावर दोन ट्रक समोरासमोर आल्याने दुसऱ्या वाहनांना जाण्यास मार्ग राहिला नाही. परिणामी, दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार दोन तास सुरू होता. दोन्ही बाजूने दोन किमी अंतरापर्यंत शेकडो वाहने थांबलेली होती. यात विनाकारण प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या ठिकाणी ग्रामीण वाहतूक पोलीस शाखेच्या सहा कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी चार तास प्रयत्न केले. यात सहायक फौजदार हिरालाल जाधव, जमादार प्रेमसिंग जाधव, नितीन बोरसे, भीमराव चेळेकर, सूर्यकांत पाटील, सुरेश मोरे, प्रमोद काळे यांनी परिश्रम घेतले.

---------------

फोटो कॅप्शन : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर चौकानजीक वाहतूक ठप्प झाली.

Web Title: Two-hour traffic jam on Aurangabad-Jalgaon highway