दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: February 13, 2015 00:47 IST2015-02-13T00:37:36+5:302015-02-13T00:47:21+5:30
तामलवाडी : हॉटेल वजा टपरी काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघे जखमी झाले़ ही घटना गुरूवारी सकाळी काटी (ता़तुळजापूर) येथे घडली असून,

दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी
तामलवाडी : हॉटेल वजा टपरी काढण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघे जखमी झाले़ ही घटना गुरूवारी सकाळी काटी (ता़तुळजापूर) येथे घडली असून, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून ११ जणाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाबजी गोरख ढगे यांची काटी येथील पेट्रोलपंपाजवळ जमीन आहे़ या जमिनीवर गावातीलच साळुंके यांनी हॉटेल वजा टपरी सुरू केली होती़ ही टपरी काढण्याच्या कारणावरून गुरूवारी सकाळी दोन गटात दगड, लोखंडी रॉड, गजाने तुंबळ हाणामारी झाली़ यात दोघे जखमी झाले आहेत़ याबाबत नाबजी ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज साळुंके, शशिकांत साळुंके, बाहल साळुंके, भैय्या साळुंके, कालिदास फंड, ज्ञानेश्वर साळुंके (सर्व राक़ाटी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर सुरज साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाबजी ढगे, भैय्या उबाळे, अनिल ढगे, भैय्या हागरे, सौदागर घाणे (सर्व राक़ाटी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)