दोन गटांचे मनोमिलन भाजपाला फलदायी

By Admin | Updated: May 18, 2014 00:48 IST2014-05-18T00:12:23+5:302014-05-18T00:48:24+5:30

उदगीर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण असताना स्थानिक नेतृत्वामध्ये मात्र मागच्या दोन वर्षापासून मोठा संघर्ष पेटला होता़

The two groups are fruitful for the BJP | दोन गटांचे मनोमिलन भाजपाला फलदायी

दोन गटांचे मनोमिलन भाजपाला फलदायी

 उदगीर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण असताना स्थानिक नेतृत्वामध्ये मात्र मागच्या दोन वर्षापासून मोठा संघर्ष पेटला होता़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षात अधिकच भर पडली़ उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव हे स्वत: निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते़ भाजपातील काही नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेकदा ‘दिल्ली’वारी केली़ मात्र आ़ भालेरावांनी कसल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये़ यासाठी माजी आ़ गोविंदराव केंद्रे यांचा गट आग्रही होता़ या गटाने माजी आ़टी़पी़ कांबळे यांचे नाव पुढे केले़ या परिस्थितीत प्रबळ दावेदार आपणच आहोत असा दावा ठोकत गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले डॉ़ सुनील गायकवाड यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरु ठेवले होते़ लातूरच्या उमेदवारीचा प्रश्न शेवटपर्यंत ताटकळत राहिला असताना अखेरच्या क्षणी भाजपाने डॉ़ सुनील गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली़ डॉ़ गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच आ़ सुधाकर भालेराव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली़ खाजगी वृत्त वाहिन्यांना मुलाखती देवून पक्ष नेतृत्वावर आक्रमक होऊन टीका केली़ त्यामुळे भाजपातील संघर्ष अधिकच पेटल होता़ या परिस्थितीत भाजपाच्या माजी खा़ रूपाताई पाटील यांनी शिष्टाई करीत भालेरावांची नाराजी दूर करून त्यांना प्राचाराच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले़ उदगीरच्या दोन गटात असलेला बेबनाव दूर करण्यासाठी दोन्ही नेत्यांना एकत्र आणून डोंगरशेळकी व हत्तीबेटावर मनोमिलन झाल्याने जाहीर करण्यात आले़ त्यानंतर मात्र दोन-चार दिवसांतच या दोन्ही गटांनी प्रचाराच्या दोन स्वतंत्र यंत्रणा राबविल्या़ दोन्ही गटाच्या नेत्यांनी भाजपासाठी मते मागत असताना मतदारांतूनच उत्स्फूर्तपणे भाजपाला म्हणून मोदी लाटेला समोर ठेवून मतदान करणार असल्याच्या प्रतिक्रिया आल्या़ मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाला पाच पटीपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळाले आहे़ निवडणुकीच्या काळात भाजपाची कुठलीच मोठी सभा झाली नाही़ याला कारणही अंतर्गत असलेली धुसफूस आडवी आली़ जळकोट येथे आ़ विनोद तावडे यांची झालेली सभा या दोन सभांचा वातावरण निर्मितीसाठी म्हणावा तितका प्रभाव पडणारा नव्हता़ मुळातच काँग्रेस नेतृत्वाविरूद्धची नाराजी असल्यामुळे या नाराजीचा फटका काँग्रेसला बसला़ माजी खा़ रूपाताई पाटील यांनी आमदार सुधाकर भालेराव यांची नाराजी दूर केल्याने त्यांनी प्रचारात सहभाग नोंदविला़ तसेच मतदारसंघात दोन गटांना एकत्रित आणून मनोमिलन घडविले़ त्यातून भाजपाचा मार्ग सुकर झाला़ आमदार सुधाकर भालेराव व माजी आ़ गोविंद केंद्रे यांच्या गटाच्या प्रचार यंत्रणा स्वतंत्रपणे राबल्यिा गेल्या़ त्यामुळे कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचले़ परिणामी, मताधिक्य वाढले आहे़

Web Title: The two groups are fruitful for the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.