शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:30 IST

ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा पथकावर दगडफेक करण्यात आली होती

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेमधून शेतीसाठी चोरून वीज आणि पाणी घेताना तीन शेतकऱ्यांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, सोमवारी (दि. १८ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास पावरलूम परिसरात घडली. यासोबतच चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. 

हर्सूल परिसर ते झाल्टापर्यंत महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेतून शहराचे सांडपाणी वाहते. यातील पाण्यावर काही शेतकरी शहराच्या आसपासच्या भागात शेती करतात. पावरलूम परिसरात अशाच प्रकारे ड्रेनेजचे पाणी चोरून शेती केली जाते. आज दुपारी या भागातील ड्रेनेज लाईनवरील चेंबरवर लावलेल्या पाण्याच्या मोटारीस दुरुस्त करताना तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या चार शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तसेच नागरिकांनी सुद्धा बचावकार्य सुरु केले आहे. जनार्दन विठ्ठल साबळे (55), दिनेश जगन्नाथ दराखे (40, दोघे रा. चिकलठाणा) व रामेश्वर केरुबा डांबे (रा.निकलक, ता. बदनापूर,जालना )  अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. मृतामधील रामेश्वर यांचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. तर रामकिसन माने , उमेश कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे आणि नवनाथ रंगनाथ कावडे (रा. चिखलठाणा ) या चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेने खळबळ उडाली आहे. 

मनपा पथकावर केली होती दगडफेक मागील काही दिवसांपासून शहराच्या जवळील शेतीसाठी भूमिगत गटारीमधून शेतकरी पाणी चोरत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली. न्यायालयाने याची नोंद घेत महानगरपालिकेने या शेतकऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे आदेश दिले. यानुसार महानगरपालिकेची पथक दोन वेळेस या भागात कारवाईसाठी गेले होते. मात्र, शेतकऱ्याने दगडफेक केल्याने पथकाला माघार घ्यावी लागली होती. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूFarmerशेतकरीPoliceपोलिसagricultureशेती