शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देत लुटणारे दोन भोंदू अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 14:08 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वीच शहरात आलेले असल्याची माहिती चौकशीत समोर आलीआरोपी एकट्या महिलांना पाहून हेराफेरी करीत त्यांच्याकडील ऐवज लंपास करीत

औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या दिवशी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना पाहून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या दोन भोंदूबाबांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. या दोघांची झाडाझडती घेतली असता, दोन ठिकाणी केलेल्या चोरीचा मुद्देमालही त्यांच्याकडे सापडला. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मुकुंदवाडी भागातील ज्ञानेश्वर कॉलनी येथे एका महिलेला भविष्य सांगण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाचे धोतर, भगव्या रंगाचा शर्ट आणि डोक्याला पिवळा फेटा बांधलेल्या व्यक्ती घरात शिरला. भविष्य सांगण्यासाठी साहित्य ठेवलेले असताना त्याने गुंगीचे औषध मिसळलेला पदार्थ टाकून महिलेला वास घेण्यास लावले. वास घेतल्यानंतर महिलेला गुंगी आली. हा डाव साधत भोंदूने ३२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (दि.२२) भवानीनगर येथील गल्ली नंबर ६ मध्ये एकटी राहत असलेल्या महिलेला दोन भोंदूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त साखर खाण्यास मागितली. जेव्हा महिलेने साखर खाण्यास दिली असता, महिलेलाच साखर खायला लावून हातावर भंडारा टाकून भोवळ आणली. यानंतर महिलेच्या घरातील ८ हजार रुपये घेऊन पोबारा केला.

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन घटनांमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित व्यक्ती श्रीकृष्णनगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी गुन्हे शाखेने सापळा लावून योगेश खंडू सोळंके (२७, मुळ गाव कोथळज, जि. हिंगोली, ह.मु.हिवरा फाटा, करमाड) आणि विश्वनाथ नारायण शिंदे (३२, मूळगाव बोरगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम, ह.मु. हिवरा फाटा, करमाड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन्ही गुन्ह्याच्या संदर्भात विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल देशमुख, अंमलदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

हा मुद्देमाल जप्तगुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन भोंदूबाबाकडून ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये रोख, फेटा, कवड्याची माळ, भंडाराची कातडी पिशवी, खंजीर वाद्य, गणपतीची मूर्ती, खंडोबाची मूर्ती, तांदुळ, खोबरा वाटी, हळद, राशीचे खडे, रुद्राक्ष, आधारकार्ड, मनगटी घड्याळाचा समावेश आहे.

दोन दिवसांची पोलीस कोठडीगुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. हे आरोपी एकट्या महिलांना पाहून हेराफेरी करीत त्यांच्याकडील ऐवज लंपास करीत होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच शहरात आलेले असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस