घरफोडी करणारे दोघेजण मुद्देमालासह जेरबंद

By Admin | Updated: April 13, 2016 00:47 IST2016-04-13T00:42:58+5:302016-04-13T00:47:05+5:30

जालना : शहर परिसरात आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आणि गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडीगोद्री येथील एका पेट्रोलपंप

Two burglars seized with the issue | घरफोडी करणारे दोघेजण मुद्देमालासह जेरबंद

घरफोडी करणारे दोघेजण मुद्देमालासह जेरबंद


जालना : शहर परिसरात आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आणि गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडीगोद्री येथील एका पेट्रोलपंप मालकाची रोख रक्कम लुटणाऱ्या संशयित आरोपींना मंगळवारी स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
शहर परिसरातील दावलवाडी आणि बीड परिसरात घरफोडी करून लोखो रूपयाचा सोने-चांदी चोरणारा आरोपी शहरातील नूतन वसाहत परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी शंकर तान्हाजी जाधव (३२, रा. बरदरी गल्ली बीड) याला ६ एप्रिल रोजी अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच जाधव याने शहरात आणि बीड येथे घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली. बदनापूर हद्दीतील दावलवाडी चोरीतील २५०० रूपयांची चांदी, बीड येथे केलेली चोरीतील २ किलो चांदी किंमत अंदाजे ४८ हजार रूपये, व ४ तोळ्याचे गंठण किंमत अंदाजे १ लाख रूपये, आणि अहमदनगर येथून चोरी केलेली मोटर सायकल असा एकूण २ लाख ५०० रूपयांचा ऐवज जाधव याच्याकडून पोलिसांनी मंगळवारी हस्तगत केला. तसेच गोंदी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वडीगोद्री येथील एका पेट्रोल मालकाची रक्कम चोरून फरार झालेला आरोपी किशोर पवार हा शहरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफिने त्यास ताब्यात अटक केली. त्याच्याकडून ६० हजार रूपये किमतीची एक मोटरसायकल, एक चाकू आदी हस्तगत करण्यात आले.

Web Title: Two burglars seized with the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.