चोरट्याकडून दोन दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:04 IST2020-12-25T04:04:46+5:302020-12-25T04:04:46+5:30

संदीप नारायण काळे (२३, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. सातारा परिसरात चोरीचे वाहन विक्री ...

Two bikes seized from thief | चोरट्याकडून दोन दुचाकी जप्त

चोरट्याकडून दोन दुचाकी जप्त

संदीप नारायण काळे (२३, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. सातारा परिसरात चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती, खबऱ्याने पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना दिली. यानंतर हवालदार अरविंद चव्हाण, संतोष मोळके, अजित लोंढे, सुनील पवार यांनी सापळा रचून त्याला संशयावरून दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत विशालनगर येथे श्रद्धा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी दुचाकी १४ नोव्हेंबर रोजी चोरल्याचे सांगितले. याप्रकरणी दुचाकीमालक शिल्पा वाहुळे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच मनसुराम बत्ताशे प्रसाद यांची दुचाकी ६ डिसेंबर रोजी त्याने चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन वाहने जप्त करून आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Two bikes seized from thief