दोन दुचाकींची धडक एक ठार; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:15 IST2018-01-17T00:15:52+5:302018-01-17T00:15:57+5:30
फुलंब्री ते राजूर रस्त्यावर रांजणगाव फाट्यानजीक भरधाव वेगात जाणाºया दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.

दोन दुचाकींची धडक एक ठार; तीन जखमी
फुलंब्री : फुलंब्री ते राजूर रस्त्यावर रांजणगाव फाट्यानजीक भरधाव वेगात जाणाºया दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली.
दुचाकी क्र. एमएच -२०-डीबी -८१९४ ही राजूरकडून येत असताना समोरून येणाºया दुचाकीसोबत (एमएच-२० -इटी -६५४३) समोरासमोर धडक झाली. यात जगन चंपत शिनगारे (३८, रा. फुलंब्री) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई (३५), मुलगी रेणुका (७) गंभीर जखमी झाले. दुसºया दुचाकीवरील देवीदास विठ्ठल बहादुरे (रा. लहानेवाडी) हा जखमी झाला.