बनावट नोटा पेट्रोल पंपावर चालविणारे दोन अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:33+5:302020-12-17T04:25:33+5:30

औरंगाबाद : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आकाश माने याने छापलेल्या नोटा पेट्रोल पंपावर चालविणाऱ्या आणखी एका शिवनेरी बसच्या ...

Two arrested for running counterfeit notes at petrol pumps | बनावट नोटा पेट्रोल पंपावर चालविणारे दोन अटकेत

बनावट नोटा पेट्रोल पंपावर चालविणारे दोन अटकेत

औरंगाबाद : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आकाश माने याने छापलेल्या नोटा पेट्रोल पंपावर चालविणाऱ्या आणखी एका शिवनेरी बसच्या चालकासह दोन जणांना सिडको पोलिसांनी शेवगाव (जि. अहमदनगर) तालुक्यातून पकडून आणले. नितीन भानुदास माळवदे (रा. शहर टाकळी) आणि रामदास अंबादास तुभारे (रा. खामगाव, ता. शेवगाव), अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, आरोपी आकाश माने, संदीप अरगडे आणि निखिल संभेरावला सिडको पोलिसांनी चार दिवसांपूर्वी बनावट नोटा छापून चलनामध्ये आणल्याप्रकरणी अटक केली होती. अरगडे याने आकाशकडून बनावट नोटा घेतल्यानंतर त्यापैकी काही नोटा शिवनेरी बसचा चालक माळवदे याला दिल्या होत्या. माळवदेने या नोटा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तुंभारेला दिल्या होत्या. त्याने काही बनावट नोटा चालविल्या होत्या. त्याच्याकडूनही काही बनावट नोटा जप्त केल्याची माहिती फौजदार पाटील यांनी दिली.

Web Title: Two arrested for running counterfeit notes at petrol pumps