बाप्पांच्या दिमतीला अडीच हजार पोलीस
By Admin | Updated: September 8, 2014 00:56 IST2014-09-08T00:09:14+5:302014-09-08T00:56:00+5:30
बीड : दहा दिवसापासून मुक्कामी असलेल्या बाप्पांना सोमवारी निरोप देण्यात येणार आहे़ या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

बाप्पांच्या दिमतीला अडीच हजार पोलीस
बीड : दहा दिवसापासून मुक्कामी असलेल्या बाप्पांना सोमवारी निरोप देण्यात येणार आहे़ या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ संवेदनशील ठिकणी जादा बंदोबस्त राहणार आहे़ मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे़
गणेशोत्सव काळात पार पडलेल्या पोळा सणासाठी बाहेरून बंदोबस्त मागविला होता़ विसर्जन मिरवणुकांसाठीही बाहेरच्या पोलिसांची मदत घेण्यात आली आहे़ मिरवणुकांमध्ये गोंधळ, गडबड होऊ नये यासाठी पोलीस अधिक सतर्क झाले आहेत़ मिरवणुका वेळेत निघाव्यात व विसर्जनही वेळेत व्हावे यासाठी पोलिसांनी सर्व मंडळांना सूचित केले आहे़ ठिकठिकाणच्या ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेऊन वातावरण सौहार्दपूर्ण राहील याची दक्षता घेण्यात आली आहे़
मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस बारीकसारीक हालचालींवर नजर ठेवून राहतील़ रविवारी बीडमध्ये पोलिसांनी पथसंचलन केले़ यातून पोलीस दल कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दाखविण्यात आले़ (प्रतिनिधी)