अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

By Admin | Updated: June 12, 2017 00:01 IST2017-06-12T00:01:08+5:302017-06-12T00:01:54+5:30

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़

Two and a half lakh farmers will get benefit of debt waiver | अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

अडीच लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा फायदा

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली आहे़ सदर निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास नांदेड जिल्ह्यातील जवळपास दोन लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे विविध बॅकांचे एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज माफ होईल़
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारून आंदोलन सुरू केले़ दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी शहरात येणारे दूध, भाजीपाला बंद करून तो रस्त्यावर फेकून देत शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध केला़ त्यातच सरकारने अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत आंदोलनाची तीव्रता कमी केली़ परंतु, शेतकरी संघटनांनी तो मान्य नसून सरसकट कर्जमाफीच पाहिजे, अशी मागणी करीत आंदोलन सुरू केले़ या मुद्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला़ त्यातच रविवारी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तत्त्वत: कर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे़
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खासगी व सरकारी बँकांचे जवळपास एक हजार ५४१ कोटी ९१ लाख रूपयांचे कर्ज आहे़ यामध्ये पीककर्ज खरीप, रबीच्या कर्जाचा समावेश आहे़ तसेच एचडीएफसी, एक्सीस, कर्नाटका, करूर वैश्य, डीसीबी, कोटक महिन्द्रा बँक अशा खासगी बँकांचे १ लाख ४६ हजार ५९७ शेतकऱ्यांनी १ हजार १३२ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक व महाराष्ट्र सहकारी बँक व जिल्हा बँक असे मिळून ६८ हजार ७५९ शेतकऱ्यांंकडे १५१ कोटी ३९ लाख तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर बँकेचे ४३ हजार २८ शेतकऱ्यांकडे जवळपास २५८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज आहे़
खाजगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर असून सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार ३८३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे़ सदरील कर्ज हे पीककर्ज स्वरूपात आहे़ दरम्यान, शेतकऱ्यांच्या पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करू नये असा निर्णय असूनदेखील काही बँकांनी बँकेत जमा झालेल्या पीकविम्यातून कर्जाचे हप्ते कपात करून घेतले आहेत़ कर्जमाफीमुळे पीकविम्यातून कपात केलेली रक्कम कशी परत मिळणार, असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडला आहे़

Web Title: Two and a half lakh farmers will get benefit of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.