दोन विषय बॅक राहीले म्हणून बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:34 IST2017-11-13T23:34:26+5:302017-11-13T23:34:29+5:30

बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

Twenty-year-old woman commits suicides as two topics remain | दोन विषय बॅक राहीले म्हणून बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या

दोन विषय बॅक राहीले म्हणून बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या

औरंगाबाद बालाजी नगर परिसरातील रहाणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. उषा कैलास राठोड असे या तरुणीचे नाव असून जवाहर नगर पोलिस ठाण्यात  या घटनेची नोंद करण्यात आली आहे.  उषा ही अंबड तालुक्यातील असून शिक्षणासाठी शहरात आली होती. तीच्या तीन मैत्रीणींसोबत ती बालाजी नगरात तारामती भवनच्या बाजुला असलेल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर पत्र्याच्या खोलीत रहात होती. सोमवारी पाचच्या दरम्यान मैत्रीणी बाहेर गेल्या असतांना ओढणीच्या साह्याने तीने गळफास घेतला. संध्याकाळी तीच्या मैत्रीणी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तीला उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. तीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून माझे दोन विषय बॅक राहीले आहे. आई वडीलांनी माझ्यासाठी खूप खर्च केला व आता लग्नाला देखील खूप खर्च होईल्. मी जगाचा निरोप घेते आहे. यास कोणास जवाबदार धरु नका असे या चिठ्ठीत लिहले असून तीने आई वडील आणि भावाची माफी मागितली आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहीती पोलिस उप निरीक्षक काशीनाथ महांडुळे यांनी दिली. 

Web Title: Twenty-year-old woman commits suicides as two topics remain