शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकासह दोघांना बदडले ; दहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: December 30, 2015 00:43 IST

बीड : शहरातून जात असलेल्या ट्रकमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून चालकासह दोघांना ८ ते १० जणांनी मारहाण केली. पोलिसांनी हा ट्रक तपासला असता

बीड : शहरातून जात असलेल्या ट्रकमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून चालकासह दोघांना ८ ते १० जणांनी मारहाण केली. पोलिसांनी हा ट्रक तपासला असता त्यात बोंबील आढळून आल्याने ट्रकचालक व इतर दोघांना मारहाण करणाऱ्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सूरज जयसिंग चुंगडे, विकी दीपकसिंग छानवाल व इतर आठजणांचा आरोपींत समावेश आहे. शहरातून जीजे ४५/८८०९ हा ट्रक चालला होता. जालनारोडवर हा ट्रक आठ ते दहा जणांनी अडवला. गोमांस असल्याचा दावा करत ट्रक चालकास कॅबिनमधून ओढून बाहेर काढले. त्यानंतर ट्रकवर चढून ताडपत्री फाडून मधील मालाची तपासणी केली. तसेच ट्रक चालक व त्याच्या दोन सहकाऱ्यांना दहाजणांनी मारहाण केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी शेकडो नागरिक जमा झाले होते. त्यामुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी हजेरी लावत तो ट्रक ताब्यात घेतला. जमावाला पांगविल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. पोलिसांनी सदरील ट्रक पूर्णत: तपासला असता त्यात कोणत्याही प्रकारचे मांस आढळून आले नाही. ट्रकमध्ये बोंबील होते. त्यामुळे ट्रक चालक व इतरांना मारहाण करणाऱ्या पियुभाई बाबुभाई सिंगल (रा. जुनागड, गुजरात) यांच्या फिर्यादीवरुन दहाजणांविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली. (प्रतिनिधी)