बावीस पोलिसांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या
By Admin | Updated: May 31, 2014 00:27 IST2014-05-30T23:55:01+5:302014-05-31T00:27:40+5:30
परभणी : जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत. त्यात नऊ अधिकारी पदोन्नतीवर बदलून गेले आहेत.

बावीस पोलिसांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या
परभणी : जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत. त्यात नऊ अधिकारी पदोन्नतीवर बदलून गेले आहेत. या अधिकार्यांना ३० मे रोजी निरोप देण्यात आला. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार या बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्यांमध्ये पोलिस निरीक्षक आर. एन. चाटे (बीड), एल. ए. शिनगारे (औरंगाबाद शहर), पोलिस निरीक्षक एस. डी. सोनवणे (बीड), निरीक्षक जी. एच. शेटे (भंडारा), निरीक्षक व्ही. एच. हाशमी (औरंगाबाद शहर), सहायक निरीक्षक विकास पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सहायक निरीक्षक जी. एम. सोंडारे (लाचलुचपत प्रतिबंधक),सहायक निरीक्षक वाय. ए. चव्हाण (कोल्हापूर), एस. एल. गुठ्ठे (एस.आय.डी), सी. ए. कदम (वाशिम), आर. बी. सहाने (नांदेड), एस. आर. कोल्हे (पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर), उपनिरीक्षक भिंगारदेव (महामार्ग सुरक्षा पथक), मो. युनूस मो. मुसा (महामार्ग सुरक्षा पथक), सी. ए. कदम (वाशिम), आर. व्ही. सहाने (नांदेड), के. वाय. तरोणे (नांदेड), महिला उपनिरीक्षक सुलभेवार (नांदेड), उपनिरीक्षक पी. जी. सुसर (नांदेड), बी. बी. तांबे (विशेष सुरक्षा पथक), उपनिरीक्षक आर. आर. तरकसे (नांदेड परिक्षेत्र), आर. टी. दोढी (नांदेड परिक्षेत्र), बी. जी. कुरे (नांदेड परिक्षेत्र), निरीक्षक सुनील जैतापूरकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) या पोलिस अधिकार्यांची बदली झाली आहे. त्यापैकी सहायक निरीक्षक एस. आर. कोल्हे, सी. एन. कदम, आर. व्ही. सहाने यांची पोलिस निरीक्षकपदी तर उपनिरीक्षक सुलभेवार, पी. जी. सुसर, आर. टी. दोडी, आर. आर. तरकसे, बी. बी. तांबे, के. वाय. तरोणे यांची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. (प्रतिनिधी)पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात या बदली झालेल्या अधिकार्यांना ३० मे रोजी निरोप देण्यात आला. अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. इतर जिल्ह्यात काम करताना पोलिस दलाचे नाव व लौकिक वाढवावा व जनमाणसात पोलिस दलाची प्रतिमा उज्ज्वल व्हावी, असे काम करण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमास सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, संजय हिबारे, माढेकर, राखीव निरीक्षक पंडित राठोड, कार्यालयीन अधीक्षिका कुलथे, रोहिणी पाथरकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विवेक मुगळीकर यांनी केले. संजय हिबारे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इरफान इनामदार, शब्बीर पठाण, दत्ता चिंचाणे, राजेश अगाशे, वंदना आदोडे आदींनी परिश्रम घेतले.