पंचवीस जणांना गॅस्ट्रोची लागण

By Admin | Updated: July 4, 2014 00:11 IST2014-07-04T00:07:44+5:302014-07-04T00:11:52+5:30

बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार १ जुलै रोजी घडला. या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Twenty-five people are infected with gasoline | पंचवीस जणांना गॅस्ट्रोची लागण

पंचवीस जणांना गॅस्ट्रोची लागण

बोरी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे २५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्रकार १ जुलै रोजी घडला. या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कौसडी येथील इखे गल्लीतील ८ ते १० ग्रामस्थांना उलट्या व जुलाब झाले. या रुग्णांना बोरी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर २ जुलै रोजी आणखी ८ ते १० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्णांमध्ये सय्यद मन्नान सय्यद बाबा, शेख बिलाल शेख मुनीर, खालेदा पाशा पठाण, इंदू दत्तराव मोरे, शेख राजन शेख गुलाब दस्तगीर, सय्यद शरीफ सय्यद मन्नान, शेख मन्नान शेख दादामियाँ यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य काही रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. (वार्ताहर)
रुग्णांची गैरसोय
दोन दिवसांपासून डॉक्टरांचा संप असल्याने गॅस्ट्रोच्या रुग्णांची गैरसोय झाली आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच कौसडी येथे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी साथ फैलू नये म्हणून उपाय योजना केली जाते. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Twenty-five people are infected with gasoline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.