शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'तुझा सैराट करू'; छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; मृताच्या पत्नीचे वडिलांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 11:40 IST

वडिलांनी दिली होती धमकी, मारेकऱ्यांचे कुटुंब कुलूप लावून पसार

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित मुरलीधर साळुंके (२५) या तरुणाची त्याच्या सासरा व मेव्हण्याने निर्घृण हत्या केली. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी त्याच्यावर त्यांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर अद्यापही सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे पसार आहेत. अमितच्या मृत्यूनंतर दोघांचे कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहे.

अमितने २ मे रोजी लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. भिन्न धर्मांमुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने ते घरी परतले होते. अमितच्या कुटुंबीयांनी विद्याच्या कुटुंबीयांना देखील दोघांना आनंदाने स्वीकारण्यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, विद्याच्या कुटुंबीयांचा अमितवरचा रोष कायम होता. खुनाच्या धमक्या ते देत होते. १४ जुलै रोजी रात्री अमितवर गीताराम व आप्पासाहेबने चाकूने वार केले. २५ जुलै रोजी अमितची मृत्यूशी झुंज संपली.

पोलिसांची परिसरात गस्तअमितच्या कुटुंबीयांसह मित्रांनी मारेकरी अद्यापही मोकाट असल्याच्या कारणावरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री संताप व्यक्त केला. सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंब परत गेले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर परिसरात गस्त घालत आरोपींचे घर तपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींची घरे कुलूपबंद आहेत.

‘तुझा सैराट करू’अमितची पत्नी विद्याने मात्र वडील व कुटुंबावर गंभीर आरोप केले. कुटुंबाने माझे बळजबरीने दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवले हाेते. त्यासाठी त्यांनी मुलाकडून ४ लाख रुपये घेतले होते. मला मात्र ते लग्नच मान्य नव्हते. त्यानंतर मी अमितसोबत माझ्या संमतीने लग्न केले. आम्ही आमच्या दोन्ही धर्माच्या पध्दतीने लग्न केले. तरी कुटुंबाने स्वीकारले नाही. लग्नानंतर माझे कुटुंबीय सतत मला 'तुझा सैराट करू' अशा धमक्या देत होते. अमितची हत्या हा कट रचून केली आहे, असा आरोपही तिने केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादHonor Killingऑनर किलिंग