शिकवण्या उदंड जाहल्या..!
By Admin | Updated: July 2, 2014 00:31 IST2014-07-01T23:48:30+5:302014-07-02T00:31:40+5:30
हिंगोली : स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात.

शिकवण्या उदंड जाहल्या..!
हिंगोली : स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात. मात्र, तरीही अनेक पालक मुलांना खासगी शिकवणीत पाठवीत असल्याचे चित्र आहे. बऱ्याचशा पालकांना मुलांचा अभ्यास घ्यायलाच वेळ मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. मुलांचा घरी अभ्यासच होत नाही, असेही या पालकांनी कबूल केले आहे.
मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे वाढते प्रमाण पालकवर्गात दिसत आहे. चांगली शाळा त्याचबरोबर चांगली शिकवणीची निवड करण्यातही पालकांची कसरत पाहायला मिळत आहे. शाळा सुरू झाल्या, की खासगी शिकवण्यांसाठी पालकांची धावपळ सुरू होते. चांगली शाळा निवडण्याबरोबरच चांगली शिकवणी मिळविण्यासाठीही धडपड केली जाते. खासगी शिकवणींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे प्रमाण व त्याची कारणे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने सर्व्हेक्षण केला. यामध्ये विविध भागांतील काही पालकांची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणानुसार शहरातील जवळपास ७२ टक्के पालकांनी आपली मुले खासगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील खासगी शिकवणीचालकांना सध्या चांगलाच भाव मिळत असल्याचे दिसून येते.
मुलांना खासगी शिकवणी का लावली,या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ५५ टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर २० टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही.
मुलांचा घरी अभ्यास होत नाही, हेही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ७५ टक्के पालक मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे ११ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. हाही पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
काही पालकांनी शाळेव्यतिरिक्त मुलांचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी शिकवणी लावल्याचे स्पष्ट केले. तसेच, बदलेला अभ्यासक्रम कठीण असल्याने शिकवणीला टाकल्याचे पालकांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रमात बरेचसे बदल झाल्याने त्या बदलत्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे कठीण असल्याने पालक मुलांसाठी शिकवणी हा पर्याय निवडताना आढळून आले. मुले
आपले ऐकत नाहीत, असे सांगणारे पालकही या सर्व्हेक्षणानिमित्ताने पुढे आले आहेत.(प्रतिनिधी)
मुलांना खासगी शिकवणी का लावली, या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ५५ टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर, २० टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही.
मुलांचा घरी अभ्यास होत नाही, हेही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ७५ टक्के पालक आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे ११ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे.
उजळणी गरजेची...
इंग्रजी माध्यमाला
पसंती मिळू लागली. शिक्षणाचा खर्च वाढत गेला. आई-वडील दोघांनाही नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर
जावे लागले.
चांगल्या शाळांमध्ये मुलांना घातले असले, तरी घरी त्यांची उजळणी घेणे गरजेचे असतेच.
बदलत्या परिस्थितीनुसार पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देणेही शक्य होत नाही. त्यामुळे खासगी शिकवण्याकडे पालकांचा ओढा वाढला.
स्पर्धा परिक्षांकडे विशेष लक्ष
सद्यस्थितीत विविध स्पर्धा परिक्षांमध्ये आपल्या पाल्यांनी यश मिळवावे, या दृष्टिकोणातून पालक कसोशिने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पाल्यांकडून विशेष तयारीही करून घेतली जात आहे. यासाठी शिकवणीचा मार्ग अवलंबिला जात आहे.