चार दिवसांत करोडोंची उलाढाल
By Admin | Updated: June 5, 2014 00:13 IST2014-06-04T23:41:51+5:302014-06-05T00:13:50+5:30
अनुराग पोवळे, नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या सावळागोंधळ सुरू असून

चार दिवसांत करोडोंची उलाढाल
अनुराग पोवळे, नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या सावळागोंधळ सुरू असून उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रजेवर असताना एका निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यावरील उपअभियंत्याकडे पदभार देवून करोडो रूपयांची देयके काढल्याची तसेच अनेक नियमबाह्य कामांना मंजुरी दिल्याची माहिती पुढे आली आहे़ याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी या चार दिवसांतील कामाचा अहवाल मागितला असून सेवानिवृत्त झालेल्या उपअभियंत्याने मात्र तो अहवाल अद्याप सादर केला नाही़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रजेवर जाण्याच्या तयारीत होते़ त्यांनी १० दिवसांची रजा मागितली होती़ मात्र प्रत्यक्षात ते चार दिवसांच्या म्हणजे २६ ते २९ मे या कालावधीत रजेवर होते़ ३० रोजी तर ते कार्यालयात हजर झाले होते़ दरम्यान, या काळात जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागाचा कार्यभार हा नांदेड उपविभागाचे प्रभारी उपअभियंता वहाब यांच्याकडे सोपविण्यात आला़ उत्तर विभागात चार दिवसांच्या या कार्यकालात करोडो रूपयांची देयके अदा करण्यात आली़ यात अनेक देयके मागील काळातील आहेत़ तसेच अनेक नव्या कामांना मंजुरीही दिली़ ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांच्या सूचना व दबावानुसार करण्यात आली असल्याचीही चर्चा सुरू आहे़ याबाबतची कुणकुण लागताच जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता तायडे यांना यासंदर्भातील अहवाल मागितला आहे़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या अनेक कामे ही पदाधिकार्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनाच दिली जात आहेत़ ही कामे दिली जात असताना काम वाटपांच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे़ याबाबत बांधकाम विभागातील अधिकार्यांनी घेतलेली सहकार्याची भूमिकाही संशयाच्या भोवर्यात सापडली आहे़ अनेक कामे ही पूर्ण न होताच देयकेही अदा केली जात आहेत़ परिणामी जि़ प़ कंत्राटदारांची चांदी होत आह़े जिल्हा परिषदेच्या मुख्यालय इमारतीची संरक्षक भिंत काही दिवसांपूर्वी पाडली गेली असताना त्याबाबत कोणतीही कारवाई जि़ प़ ने केली नाही़ त्यातच आता जिल्हा परिषदेने मुख्यालय परिसरात नालीचे काम सुरू केले असून हे काम संरक्षक भिंतीपासून जवळपास ३ फूट आत सुरू आहे़ त्यामुळे नालीच्या बाजूची जागा खाजगी मालकाच्या घशात घातली जाते की काय, अशी परिस्थिती आहे़ याकडे जिल्हा परिषदेत जाणार्या अधिकारी व पदाधिकार्यांनीही दुर्लक्षच केले आहे़ विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारापाशीच हे काम सुरू आहे़ याबाबतीत आता मुख्य कार्यकारी अधिकारी काळे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे़ ्न्नजिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे यांना रजेच्या काळातील चार दिवसांत झालेल्या कामांचा अहवाल मागण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी सूचना दिल्या़ या सूचनेनुसार तायडे यांनी त्यांच्या रजेच्या काळात कार्यभार सांभाळणार्या उपअभियंता वहाब यांच्याकडे अहवाल मागितला आहे़ प्रत्यक्षात वहाब हे ३१ मे रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले़ त्यामुळे निवृत्तीनंतर ते आता अहवाल सादर करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे़