शहरातील बंद असलेले ट्रान्सफार्मर चालू करा

By Admin | Updated: June 17, 2014 01:12 IST2014-06-16T23:58:14+5:302014-06-17T01:12:00+5:30

अहमदपूर : शहरात वेळोवेळी सुरू असलेले भारनियमन बंद करावे व शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर तात्काळ चालू करावे, अशा मागणीसाठी शिवसेना अहमदपूर शाखेच्या वतीने महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.

Turn off the transformer in the city | शहरातील बंद असलेले ट्रान्सफार्मर चालू करा

शहरातील बंद असलेले ट्रान्सफार्मर चालू करा

अहमदपूर : शहरात वेळोवेळी सुरू असलेले भारनियमन बंद करावे व शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर तात्काळ चालू करावे, अशा मागणीसाठी शिवसेना अहमदपूर शाखेच्या वतीने महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले.
अहमदपूर हे मोठ्या लोकसंख्येचे शहर आहे. या ठिकाणी सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुले शिक्षणासाठी येतात. परंतु, शहरामध्ये सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ या वेळेमध्ये भारनियमन होत असते. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उष्णतेला सामोरे जावे लागत आहे. भारनियमनाव्यतिरिक्त दिवसातून अनेकवेळा वीज जात असल्याने अहमदपूर शहरात चोऱ्या, छेडछाडीचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, यावर उपाययोजना करण्याऐवजी महावितरण या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे.
तोंडावर आलेली पेरणी, सुरू असलेली लगीनसराई व शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ यामुळे बाजारात लोकांची वर्दळ दिसून येत आहे. वाढत्या भारनियमनामुळे, व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शहरात उभे असलेले ट्रान्सफार्मर ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी आहे. त्यामुळे वाढते भारनियमन त्वरित रद्द करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कार्यालयास दिलेल्या निवेदनात करण्यात आला. निवेदनावर तालुकाध्यक्ष बालाजी रेड्डी, प्रल्हाद पुणे, सुदर्शन हामणे, शंकर चोले, राम जाधव, सुनील हलसे, वैभव शेटकार, सचिन ढाकणे, राजेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Turn off the transformer in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.