समायोजन मुद्दा रेटण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: June 2, 2016 23:21 IST2016-06-02T23:20:12+5:302016-06-02T23:21:09+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेत संचमान्यतेतील त्रुटींचे त्रांगडे सोडविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याने समायोजन तसेच रेटून नेण्याचा प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे.

Trying to leave the adjustment issue | समायोजन मुद्दा रेटण्याचा प्रयत्न

समायोजन मुद्दा रेटण्याचा प्रयत्न

हिंगोली : जिल्हा परिषदेत संचमान्यतेतील त्रुटींचे त्रांगडे सोडविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याने समायोजन तसेच रेटून नेण्याचा प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे. विविध शिक्षक संघटनांचा समायोजनात चुकीची पद्धत राबविल्यास न्यायालयात जाण्याचा पवित्रा आहे.
गेल्या चार दिवसांपासून विविध शिक्षक संघटना सक्रिय झाल्या आहेत. संचमान्यतेतील त्रुटी दूरच झाल्या नसल्याची कुणकुण लागताच ही मंडळी सक्रिय झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रक्रियेचे चर्वितचर्वण सुरू असताना शिक्षक, मुख्याध्यापकांना कधी जाग आली नाही. शिक्षण विभागानेही घटणाऱ्या शिक्षकसंख्येबाबत गांभिर्य दाखविले नाही. केवळ एवढ्याच कारणांवर संचमान्यतेचे गुऱ्हाळ थांबत नाही तर आता पगारांचा मुद्दा गंभीर बनणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Trying to leave the adjustment issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.