नंदनवन कॉलनीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 26, 2014 01:00 IST2014-06-26T00:56:41+5:302014-06-26T01:00:28+5:30
औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.

नंदनवन कॉलनीत एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : शहरातील काही बँकांचे अॅटोमॅटिक टेलर मशीन (एटीएम) ची सुरक्षा रामभरोसे आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम केंद्रांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. नंदनवन कॉलनी येथील जयजवान टॉवर इमारतीमध्ये असलेले स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
नंदनवन कॉलनी या उच्चभ्रू वसाहतीमधील जयजवान टॉवर येथे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला नाही. बेवारस आणि सुरक्षा नसलेल्या एटीएम सेंटरमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास दोन चोरटे घुसले. त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न के ला. सुमारे आठ ते दहा मिनिटे त्यांचे प्रयत्न सुरू होते.
बुधवारी सकाळी काही ग्राहक पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना एटीएमचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यांनी ही माहिती छावणी पोलिसांना दिली. पोलिसांनी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना कळविले. शेवटी इपिक कंपनीचे औरंगाबाद चॅनल व्यवस्थापक सुशील भीमराव धुळे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी दोन अनोळखी चोरट्यांविरोधात छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे ठाणे अंमलदार पाईकराव यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीची घटना
मागील आठवड्यात चोरट्यांनी टिकावच्या साह्याने नवामोंढा परिसरातील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरातील सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएम मशीनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.