ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:23 IST2017-11-26T00:23:02+5:302017-11-26T00:23:06+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. याचा फटका औरंगाबादेतून विमानसेवेने हैदराबाद, तिरुपतीला जाऊ इच्छिणा-या प्रवाशांना बसणार आहे, तसेच हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी औरंगाबादेत येणाºया भाविकांची संख्याही घटणार असल्याने वाहतूक क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.

Trujett aircraft is three days a week in December | ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस

ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ट्रूजेटचे विमान डिसेंबरमध्ये आठवड्यातून तीनच दिवस उड्डाण करणार आहे. याचा फटका औरंगाबादेतून विमानसेवेने हैदराबाद, तिरुपतीला जाऊ इच्छिणा-या प्रवाशांना बसणार आहे, तसेच हैदराबादहून शिर्डीला साई दर्शनासाठी औरंगाबादेत येणाºया भाविकांची संख्याही घटणार असल्याने वाहतूक क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.
डिसेंबरमध्ये आठवड्यातील बुधवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशीच विमानाचे उड्डाण करण्याचे नियोजन ट्रूजेट कंपनीतर्फे करण्यात आले आहे. हैदराबाद येथून सायंकाळी ७.३० वाजता विमान चिक लठाणा विमानतळावर येईल आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास हे विमान हैदराबादसाठी उड्डाण घेईल. याचे नियोजन विमानतळावरील ट्रूजेटच्या कार्यालयासही प्राप्त झाले आहे; परंतु त्यामागील कारण स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले. 

 

 

Web Title: Trujett aircraft is three days a week in December