खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:56 IST2018-02-12T00:55:51+5:302018-02-12T00:56:10+5:30
‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे... जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अपार्वे’ या साने गुरुजींच्या कवितेतील ओळी आज खºया अर्थाने सेवानिवृत्त झालेले तालुक्यातील एक शिक्षक सार्थ ठरवीत आहेत. नोकरीत असताना सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेले हे व्रत विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही सुरूच ठेवले आहे. अशा या गुरुजींना आजच्या काळातील साने गुरुजी म्हटल्यास वावगे ठरू नये.

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...
सुरेश चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे... जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अपार्वे’ या साने गुरुजींच्या कवितेतील ओळी आज खºया अर्थाने सेवानिवृत्त झालेले तालुक्यातील एक शिक्षक सार्थ ठरवीत आहेत. नोकरीत असताना सुमारे पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेले हे व्रत विशेष म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही सुरूच ठेवले आहे. अशा या गुरुजींना आजच्या काळातील साने गुरुजी म्हटल्यास वावगे ठरू नये.
तालुक्यातील चिकलठाण येथे २३ मार्च १९४५ रोजी येथे जन्म झालेले सर्वेश्वरराव विश्वनाथराव जोशी हे दहावी उत्तीर्ण आहेत. १ जुलै १९६५ रोजी त्यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली, तर वयाच्या ५८ व्या वर्षी म्हणजे ३१ मार्च २००३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तालुक्यातील मुंगसापूर, साळेगाव, वडाळी, जैतखेडा, चिकलठाण व डोणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून त्यांनी नोकरी केली.
काही विद्यार्थी हुशार असूनही आणि शिकण्याची जिद्द असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडतात आणि त्यामुळे त्यांच्या नशिबी पुन्हा पारंपरिक व्यवसाय येतो. त्यामुळे अशा हुशार, होतकरू मात्र गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करायची, अशी मनाशी गाठ बांधून त्यांनी हे व्रत सुरू केले. त्यांनी मदत केलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, उपविभागीय अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत; मात्र त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नये म्हणून त्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला, मात्र ही संख्या २० पेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा या त्यागी सेवानिवृत्त शिक्षकाला कोणतीही प्रसिद्धी नको वाटते. तशी भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
‘लकी ड्रॉ’मधील मोटारसायकलचे पैसेही दान
ज्या ज्या शाळेत नोकरी केली त्या त्या शाळेत आई आणि चुलत्याच्या स्मरणार्थ एक हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत मुदत ठेव ठेवली आहे. या रकमेवर मिळणारे व्याज शाळेतून दरवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून दिले जाते.
च्चिकलठाण येथे हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी सोडत काढण्यात आली. त्यात जोशी गुरुजींना मोटारसायकल लागली. त्यांनी ही मोटारसायकल तिथेच विकून टाकली. आलेल्या ३० हजारांपैकी १५ हजार रुपये मंदिर बांधकामासाठी, तर १५ हजार रुपये शाळेत आईच्या स्मरणार्थ श्रीरामदूत या नावाने मुदती ठेव ठेवले.
च्त्या रकमेच्या व्याजातून प्रथम येणाºया विद्यार्थ्यास रोख बक्षीस दिले जाते. त्यांच्या घराजवळ एक नारळाचे झाड असून, त्याला येणारे नारळ विकून मिळणारी रक्कम ते हनुमान मंदिरासाठी दान देतात.