ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: April 4, 2015 00:33 IST2015-04-04T00:30:37+5:302015-04-04T00:33:35+5:30

जेवळी : भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला़

Trucker killed in truck crash | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


जेवळी : भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला़ हा अपघात शुक्रवारी दुपारी मुंबई- हैद्राबाद महामार्गावरील जळकोट (ता़तुळजापूर) येथे घडला असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळकोट येथील पेट्रोल पंपाजवळ महामार्गालगत जळकोट येथीलच बळीराम सोपान मंकराज (वय-४६ रा़ होनाळा) दुचाकी (क्ऱएम़एच़-२५- झेड़ २९९) थांबवून एका इसमाशी बोलत थांबले होते़ त्यावेळी सोलापूरहून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्ऱएम़एच़२५- यू़ ४९४५) समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बळीराम मंकराज यांचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी जळकोट येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यातदिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि एम़वाय़डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ सुनिल मनगिरे हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Trucker killed in truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.