ट्रकच्या धडकेत व्यापारी जागीच ठार

By Admin | Updated: April 13, 2015 00:46 IST2015-04-13T00:36:43+5:302015-04-13T00:46:28+5:30

राजूर : आयशर ट्रकने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात राजूर येथील व्यापारी मंजाराम दत्तू हिवाळे हे जागीच ठार झाले. राजूर येथील शिवनेरी ढाब्याजवळ दि.१२ रोजी दुपारी एक वाजता घडली.

The truck was hit by a truck on the spot | ट्रकच्या धडकेत व्यापारी जागीच ठार

ट्रकच्या धडकेत व्यापारी जागीच ठार


राजूर : आयशर ट्रकने दुचाकीला धडक देवून झालेल्या अपघातात राजूर येथील व्यापारी मंजाराम दत्तू हिवाळे हे जागीच ठार झाले. राजूर येथील शिवनेरी ढाब्याजवळ दि.१२ रोजी दुपारी एक वाजता घडली.
ट्रक (क्रमांक एम.पी.0९ जी.एफ ८५४६) राजूरकडून जालन्याला बेकरीचे साहित्य घेवून जात हाता. समोरून मोेटारसायकल (क्रमांक एम.एच.२१,ए.के.७६८४) राजूरकडे येत असतांना शिवनेरी ढाब्याजवळ ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार मंजाराम हिवाळे दुचाकीवरून दूर अंतरावर फेकल्या गेले. दगडावर आदळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.
अपघात एवढा भयानक होता की, यामधे दुचाकी पार चुरा झाली तर ट्रक पलटी होवून रस्त्याच्या कडेला जावून पडला.
अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. मंजाराम हिवाळे हे मानदेवळगांव (ता.बदनापूर) येथील रहिवाशी होते. त्यांची राजूर येथे मशिनरी साहित्य विक्रीचे दुकान आहे.
रविवारचा आठवडी बाजार असल्याने ते गावाकडून राजूरकडे येत होते. परंतु मध्येच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
अपघाताची माहीती मिळताच राजूर पोलिस चौकीचे कर्मचारी आर.बी.उनगे, के.के.वाघ, प्रमोद म्हस्के, जगदीश बावणे, विष्णू बुनगे, प्रतापराव चव्हाण, वसंत रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. याप्रकरणी राजूर पोलिस चौकीत ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: The truck was hit by a truck on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.